धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी ते रामगाव दरम्यानच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आज दि. ५ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. प्रतापदादा अडसड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदारांच्या वतीने धामणगाव नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई रोठे (अक्का) यांनी सदर निवेदन स्वीकारले.
सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.

नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई रोठे यांनी निवेदन स्वीकारताना या कामाचा पाठपुरावा करून दि. १० मार्चपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













