चांदूर रेल्वे :- (ता. प्र.)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चांदूर रेल्वे शाखेची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी विवेक राऊत, उपाध्यक्षपदी रितेश मुंधडा, सचिवपदी राजीव शिवणकर, कोषाध्यक्षपदी राजेश सराफी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभाकर भगोले यांचीही नियुक्ती करण्यात आली.
अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाची बैठक गुरूवारी चांदूर रेल्वे येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर यांची उपस्थिती होती. यावेळी अ. भा. ग्रा. पत्रकार संघ, चांदूर रेल्वे शाखेची नविन कार्यकारणीची निवड केली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी विवेक राऊत, उपाध्यक्षपदी रितेश मुंधडा, सचिवपदी राजीव शिवणकर, कोषाध्यक्षपदी राजेश सराफी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर तालुका सदस्य म्हणून प्रभाकर भगोले, उत्तमराव गावंडे, युसूफ खान, प्रा. रवींद्र मेंंढे, बाळासाहेब सोरगीवकर, अमोल गवळी, निशिकांत देशमुख, इरफान पठाण, अमर घटारे, धीरज नेवारे, रवी कलाने, शहजाद खान, संजय डगवार, विनय गोटेफोडे, मनिष खुने, राहूल देशमुख, प्रशांत सिसोदीया, प्रकाश रंगारी, पियुष ठोंबरे, सुमेद सरदार राहणार आहे. निवड झालेल्या कार्यकारीणीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यावेळी संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा सुध्दा करण्यात आली.












