बँक ऑफ महाराष्ट्र जवळुन एका महिलेची पंचवीस हजार पाचशे रुपयाची पर्स अज्ञात चोरट्याने उडवली बस स्थानकावरून बस मध्ये चढताना दोन हजार रुपये असलेले ईश्वर कांबळेचे पॉकीट केले लपास

0
300

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : दि. ०५/०२/२०२६ ला बँक ऑफ महाराष्ट्र जवळुन पंचवीस हजार पाचशे रुपये भरली असलेली महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पायतीवर राऊन संधी साधून केली लंपास ही महिला प्रमिला नागोराव कडू वय (५५) रा. बोरगाव हातला इथली रहिवाशी असून दुधाचा घरी व्यवसाय आहे अशा या महिलेने दुधाचा चुकारा करण्याकरिता आर्वी येथे दुपारी दोन वाजताच्या दरम्यान येऊन बँक ऑफ बडोदा बँकेतून २६,५०० रुपये विड्रॉल केले. व त्यातले एक हजार रुपये खर्चा साठी बाहेर काढले व पंचवीस हजार पाचशे रुपये एका छोट्या पर्समध्ये काढून ठेवले व तसेच तेथून बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पासबुक घेण्याकरिता प्रमिला कडू आल्या असता पायतीवर असणाऱ्या चोरट्याने संधी साधत पंचवीस हजार पाचशे रुपयाची भरलेली पर्स उडवली चोरीच्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. प्रमिला कडू यांनी पैशाची पर्स बॅगमध्ये पाहली व शोधा शोध केली परंतु पर्स दिसून न आल्याने प्रमिला कडू यांनी पोलिस स्टेशन गाठून या घटनेची पोलिसात तक्रार दिली आहे

एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या फरकात दोन चोरीच्या घटना

तसेच ईश्वर कांबळे वय ५८ रा. मेंडला तालुका नरखेड जिल्हा नागपूर नामक व्यक्ती हे जावाई सुशील अवचार यांच्याकडे आले असता गावाला वापस जाण्याकरिता आर्वी बस स्थानकावर दि. ०५/०२/२०२६ ला दीड वाजताच्या दरम्यान आले व बस मध्ये चढताना मागच्या खिशातून दोन हजार रुपये असलेले पाकीट अज्ञात चोरट्याने उडविले. तोंडी तक्रार दिली असून या घटनेचा तपास आर्वी पोलीस करीत आहे.

veer nayak

Google Ad