धामणगाव रेल्वे. पद्मश्री फाउंडेशन नागपूर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा राज्यस्तरीय श्री गुरुदेव जीवनगौरव पुरस्काराने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. लहानपणापासूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री संत गाडगे महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे यासाठी गेल्या 25 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, अनिष्ट रूढी ,यावर प्रबोधन करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपण केलेले आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेच्या आधारे प्रबोधन करून आणि राष्ट्रीय कार्यात योगदान देत आहात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आचार्य वेरूळकर गुरुजी यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी सुसंस्कारित आदर्श घडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आपल्याला श्री गुरुदेव सर्वांनी सुसंस्कार बालसुसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉक्टर संजय जी आदमने ग्रामगीताचार्य प्रमोद भोंगे, प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप वेदांताचार्य विठ्ठलदास काठोळे महाराज तालुका सेवा अधिकारी रमेश दादा ठाकरे व प्रचार प्रमुख गोपाल कडू, गोपाल जी भूत, राधाताई भूत यांच्या उपस्थितीत ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांना राज्यस्तरीय श्री गुरुदेव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Home आपला विदर्भ अमरावती राज्यस्तरीय श्री गुरुदेव जीवनगौरव पुरस्काराने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे सन्मानित










