श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथे “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी” साजरी. 

0
17

(धामणगाव रेल्वे वार्ताहर) 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 

व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य शरद नायक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक बोंद्रे,प्रा.ऋषाली देशमुख प्रा योगेश मुंदे उपस्थित होते. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कुमारी तेजस्विनी म्हात्रे, कुमारी तेजस्विनी इंगळे, श्रीराज यावले यांनी आपल्या भाषणांमधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणामध्ये व महिला मुक्ती, महिला सक्षमीकरण मध्ये मोलाचा वाटा आणि त्यांचे सामाजिक कार्य इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्ष भाषणामध्ये प्राचार्य डॉ. शरद नायक यांनी राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्याचा उपस्थिताना परिचय करून दिला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृत्तिका ढगे हिने केले. तर आभार प्रदर्शन रोहिदास सावके यांनी केले. 

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदूशेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी महादेवराव शिवनकर, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्राचार्य डॉ .शरद नायक, प्रा.उमेश तलमले , प्रा. निलेश शेळके. प्रा.दीक्षा मोजे, प्रा. मनीषा लांडे, प्रा.राजेश इंगोले, प्रा परीक्षित राऊत, श्री सुहास आप्तूरकर, श्रीराम डोळस, श्री सागर शेंडे, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad