अमरावती.. उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आणि शेतकरीच आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे.असे मत माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केले.नुकतेच अमरावती येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेखाताई ठाकरे यांनी भुषविले होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलभाऊ राणा उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वातील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना एकमेव असल्याचे सुनीलभाऊ राणा यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असुन प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झालेला आहे.संघटनेच्या दिर्घ तथा तेवढ्याच प्रखर संघर्षात्मक लढ्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच काम बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने केले असल्याचे मनोज चव्हाण यांनी आपल्या भाषणातुन सांगितले. ते पुढे म्हणाले की. संघटनेने संपादन केलेल्या यशामागे या जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार व राजकीय नेत्यांनी आम्हाला साथ दिली.परुंत कुणीही आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचं काम केलं नाही. त्यामुळे मला माझ्या जिल्ह्यातील सर्व आमदार आजी माझी खासदार व सर्व नेत्यांबद्दल आदर व सन्मान आहे.

४६ डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा विदर्भाच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो प्रकल्पग्रस्तांनी आपली उपस्थिती दर्शविली. दुग्धशर्करा योग म्हणजे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा अभिष्टचिंतन सोहळा सुध्दा साजरा करण्यात आला.यावेळी प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदी व उत्साहपूर्ण वातावरण दिसत होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकते मधुन संघटनेच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.निलेशजी ठाकरे यांनी वाचुन दाखवला. व पुढील नियोजना संदर्भात माहिती दिली.या प्रसंगी विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींना संघटनेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील नवीन जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षाच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्यात. कार्यक्रमा दरम्यान आमदार रविभाऊ राणा आमदार बच्चुभाऊ कडू यांनी फोनवरून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी मंचावर संघटनेचे सचिव गौतमजी खंडारे, सहसचिव अजयभाऊ भोयर,कोषाध्यक्ष संजय गिद,जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ काळे,संघटक राजुभाऊ लोणकर,दिलिपभाऊ कदम, मनोज भाऊ तंबाखे, अरुण पाटील तायडे, अतुल भाऊ मुळे, विवेकजी डेहनकर, अनिलजी मुंढे, लक्ष्मण बोडखे,सचिन ढवळे, रामेश्वर मेटे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्राचे सुत्रसंचलन संघटनेचे प्रवक्ते श्रीकृष्ण बैलमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुर विघे यांनी केले.












