कुऱ्हा येथे मालवाहतूक वाहन व दुचाकीची जोरदार धडक. प्रशांत हुडे यांचा जागीच मृत्यू.
कुऱ्हा (प्रतिनिधी): वाढोणा येथील सरपंच तसेच धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रशांत हुडे यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हा परिसरात मालवाहतूक वाहन व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार असलेले सरपंच प्रशांत हुडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे वाढोणा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.













