▪ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ₹६० ने झालेल्या वाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे, असे मत नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी व्यक्त केले आहे.▪ नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी ) नांदगाव खंडेश्वर –
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्थानिक तहसीलदारांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

सध्या सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलेली असताना केंद्र सरकारने गॅसच्या किमती पुन्हा वाढवून जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारने घरगुती गॅसचे दर गगनाला भिडवल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे.
या होत्या प्रमुख मागण्या:
वाढवलेली गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.
गॅसवरील अनुदान (Subsidy) पूर्ववत करून ते थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करावे.
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवून जनतेला दिलासा द्यावा.
यावेळी बोलताना नगरसेविका प्रांजली गुल्हाने म्हणाल्या की, “केंद्र सरकारने ही अन्यायकारक दरवाढ मागे न घेतल्यास आगामी काळात जनतेच्या हितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.”
या निवेदनावर सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नंदकुमार (नंदुभाऊ) रावेकर शुभम चौधरी आर.बिजवे राजु गुल्हाने, विनोद रावेकर,प्रभु भोयर,इम्रान खान,साहेब खान,जावेद खान,सलाम खान,शारिक खान,साबीर कुरेशी,फिरोज खान, अकरम,तन्वीर,जुनैद खान ,मजिद खान,
रिझवान,शारिक,मनसब खा,साकीब,सलमान कुरेशी,शाहरुख खान,शोयब रझा,अमिन कुरेशी,अनिस कुरेशी,ईत्यादी सहकारी आणि नागरिकांच्या सह्या आहेत. तहसील प्रशासनाने हे निवेदन स्वीकारून जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.













