वीर नायक न्यूज नेटवर्क

0
28

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर परिसरातील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

तळेगाव दशासर (ता. धामणगाव रेल्वे) परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री तुषार अशोकऱाव धनजोडे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दशासर व धामणगाव रेल्वे तालुक्यातील मोठे गाव, असून येथे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असून, सध्या कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी लांबवर जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्च, वेळ आणि आर्थिक फटका बसत आहे.

कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांची अडचण वाढणार असून त्यांना दिलासा मिळावा म्हणून CCI कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनाची प्रत पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच आमदार प्रतापदादा अडसड यांनाही देण्यात आली..

veer nayak

Google Ad