दाभाडा येथे सामूहिक रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाचे वातावरण असूनही गावातील अनेक बहिणींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि डॉ. निलेश विश्वकर्मा यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या. या प्रसंगी डॉ. विश्वकर्मा यांनी त्यांच्या बहिणींसोबत भावनिक चार्चा केली आणि त्यांना नेहमीच त्यांच्या मदतीसाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

0
61

डॉ. विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणात विशेषतः शिक्षण, नोकरी आणि आरोग्य या विषयांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, गावातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी ते आवश्यक त्या सर्व मदतीसाठी सदैव तयार राहतील. त्यांनी नोकरीच्या संधींवरही भर देत, गावातील तरुणांनी आत्मनिर्भर होण्याचे आणि विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी शोधण्याचे आवाहन केले. आरोग्याच्या संदर्भातही त्यांनी गावकऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून दिले आणि आवश्यक ते आरोग्यसेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

या सोहळ्यामुळे गावात एकता आणि सहकार्याचे वातावरण निर्माण झाले आणि बहिण-भावाच्या नात्याचा आदर आणि महत्त्व अधोरे.

veer nayak

Google Ad