आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आर्वीतील नगरसेविका शुभांगी प्रमोद गाठे यांचा मुलगा देवांशू प्रमोद गाठे यानी चिकाटी जिद्द व मेहनतीने सीबीएसई बोर्ड दहावीत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीचा नुकताच निकाल जाहीर झाला. आर्वीच्या तपस्या पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थी देवांशू प्रमोद गाठे यांनी ९६% टक्के गुण प्राप्त करून प्रथम यश मिळवल्याबद्दल त्याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. एका सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या देवांशूच्या या कार्यामुळे त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.
देवांशू चे वडील एक उत्तम व्यावसायिक असून सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. तसेच देवांशूची आई ही एक गृहिणी असून आर्वीतील प्रभाग क्रमांक ९ ची नगरसेविका आहे. देवांशुच्या यशामुळे सोशल मीडिया व विविध माध्यमावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे












