स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ

0
35

धामणगाव रेल्वे (२२ एप्रिल २०२५) – स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे आजपासून विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराला उत्साहात सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद अध्ययन आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून साजरा व्हावा, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला, नृत्य, संगीत, योग, मैदानी खेळ, व्यक्तिमत्त्व विकास, आनंद खेळ तसेच मराठीत संवाद कौशल्य वाढविणारे उपक्रम घेण्यात येत आहेत.

शाळेच्या प्राचार्या सौ. प्रचिती धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून हे शिबिर उत्तमरित्या राबवले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या शिबिराला पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शाळेतील संपूर्ण परिसर आनंद, उत्साह, कलेचा आविष्कार आणि शिकण्याच्या ऊर्जेने भरलेला असून हे शिबिर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

veer nayak

Google Ad