धामणगाव रेल्वे…….. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धामणगावले रेल्वे अंतर्गत शिवजयंती निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये नगरातील सर्व जनता सहभागी झालेली होती .कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून ढोल, ताशे व विविध देखावे तयार करण्यात आलेले होते .छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली ,जिजामाता यांची वेशभूषा, यांच्या सोबतच वारकरी दिंडी ,छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि विशेष म्हणजे श्री संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांची झाकी तयार करण्यात आलेली होती . या झाकीच्या माध्यमातून जनतेला संत गाडगे महाराज यांची दशसूत्री व स्वच्छतेचा संदेश शिवजयंतीच्या निमित्ताने जनतेला देण्यात आला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा ,व्यसनमुक्ती, स्वच्छता, शिक्षण ,अशा विविध विषयावर संबोधन करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

श्री संत गाडगे महाराज यांची हुबेहूब वेशभूषा धामणगाव नगराचे गाडगे महाराज म्हणून परिचित असलेले ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी सुंदर भूमिका साकारून नगरातील सर्व जनतेला संत गाडगे महाराज यांची दशसूत्री व स्वच्छतेचा संदेश आपल्या फिरत्या कीर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला. संत गाडगे महाराज यांनी सांगितलेली दशसूत्री म्हणजे भुकेल्यांना अन्न, तहानल्यांना पाणी ,बेघरांना सहारा ,गरिबांना शिक्षण ,बेकारांना आधार, आंधळ्याला लगड्यांची सेवा, आई वडिलांची सेवा अशी विविध विषय या फिरत्या कीर्तनाच्या माध्यमातून माऊली दास ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी जनतेला संदेश दिला.शिवजयंती निमित्ताने विविध देखाव्याने लोकांची मने वेधून घेतले.शिव शंकर देखाव्याने लोकांना आनंदित केले.सोबतच वारकरी मंडळानी पाऊल्यांनी व दिंडीनी मंगलमय वातावरण निर्माण केले.या रॅली मध्ये गावातील सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन शिव जयंती आनंदात साजरी केले .या मिरवणुकीत आमदार प्रताप दादा अडसड, नगराध्यक्षा डॉ.अर्चनाताई अडसड ,खासदार अमरभाऊ काळे,माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते .रॅली चा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला. व कार्यक्रमाचा शेवट झाला.


















