दिनांक:१४/०४/२०२६ : एस ओ एस कब्स येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. . प्री. प्रायमरी हेड मा. शबाना खान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगितले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय तसेच सर्वांना समान वागणूक देण्याची प्रतिज्ञा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश जीवनात आचरणात आणावा असे समजावून सांगितले.
प्री. प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी, वर्षा देशमुख, रेणुका सबाणे, आकांक्षा महाले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदणे, स्नेहल दुर्गे, ऋचा अलवाडकर यांनी सहकार्य केले.
















