स्कूल ऑफ स्कॉलर्स (प्रायमरी) व एस. ओ. एस. कब्स, धामणगाव रेल्वे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0
2

धामणगाव रेल्वे | दिनांक : ०३/०१/२०२६

भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, महान समाजसुधारिका व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे (प्रायमरी विभाग) येथे कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या प्रार्थना सभेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी वर्ग तिसरीची विद्यार्थिनी अन्वी (अवनी) काळबांडे हिने सावित्रीबाई फुले यांच्या वेशात भूमिका साकारून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. तिच्या सादरीकरणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

कार्यक्रमाचे संचालन वर्ग तिसरीची विद्यार्थिनी साची मुंधडा हिने आत्मविश्वासाने केले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित कविता, मनोगते व भाषणांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी शाळेच्या प्राचार्या माननीय प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची ज्ञानाच्या महत्त्वावर आधारित बोधकथा सांगितली. ज्ञान हेच खरे वैभव असून शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात यश, समृद्धी व सुसंस्कार प्राप्त होतात, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी माननीय प्रितेश जणवाडे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंग्रजी विषयाच्या शिक्षिका स्नेहा काकस यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन हाऊस च्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

याच अनुषंगाने, शाळेच्या एस. ओ. एस. कब्स, बुधवार बाजार रोड, धामणगाव रेल्वे येथेही सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे प्री-प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी के.जी. २ ची विद्यार्थिनी अदिती कोवे व श्रेयांश निगोट यांनी अनुक्रमे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. तसेच शिक्षिका आकांक्षा महल्ले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून त्यांच्या कार्याचा संदेश दिला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व, महिला सशक्तीकरण व समाजसेवेची भावना रुजविण्यात आली.

veer nayak

Google Ad