सर्व समाजाचे हित यामध्ये आहे असे संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले म्हणून त्या संविधानाचे जोपासण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज तक्षशिला सार्वजनिक वाचनालया अंतर्गत आयोजित चार दिवसीय जयंती महोत्सवामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांना स्पर्धे परीक्षा विषयक विशेष मोलाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केल.

या जयंती उत्सव समारोपय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ हेंडवे, अतुल बहातकर, गणेश सरोदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या जयंती महोत्सवाची सुरुवात 11 जानेवारीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीने करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन अर्चनाताई रोठे यांनी केले. यावेळी उपस्थित विविध मान्यवरांमध्ये प्रामुख्याने शरद आहेर ठाणेदार मंगरूळ दस्तगीर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.नंदकिशोर राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती त्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
चार दिवसीय या जयंती उत्सवामध्ये बारा तास वाचन व सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.
संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून पार पाडेल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन टाले आभार प्रदर्शन राजेंद्र ठाकरे यांनी केले तर चारही दिवस मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते सोबतच विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये होती. उन्हाळ्याचे तापमान वाढत असले तरी या कार्यक्रमासाठी आवर्जून विद्यार्थी उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व श्री देवीदास टाले,भीमराव डंगारे, ज्योती भातपिरे, निलेश मनोहर,सुरज काळबांडे, व सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली.













