मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ११ मधून बसपाच्या उमेदवारी अर्जाची नोंद

0
6

अमरावती : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेजरपुरा–रुक्मिणी नगर येथील प्रभाग क्रमांक ११ मधून बहुजन समाज पार्टीच्या वतीने सौ. संगीता प्रदीप महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय गोडांणे, बडनेरा विधानसभा अध्यक्ष सचिनभाऊ वैद्य, जिल्हा प्रभारी अनंत लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संजय पाटील, सौरभ खोड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करताना बसपाने सामाजिक न्याय, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. आगामी निवडणुकीत मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

veer nayak

Google Ad