धामणगाव रेल्वे परिसरातील मंगरूळ दस्तगीर टी पॉईंट (छत्रपती संभाजी महाराज चौक) येथे 14 एप्रिल निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महान इतिहासपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सजवलेल्या मंचावर छत्रपती संभाजी महाराज, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसरात आकर्षक सजावट व फुलांची आरास करण्यात आली होती. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, तरुण मंडळे व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दत्तापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ट्राफिक पोलीस यांनीही उपस्थित राहून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवले.

या कार्यक्रमात राजाभाऊ व्यवहारे, गोलू राठी, राजू काळे, सुदर्शन संगीतराव, अक्षय धोपटे, अभिजीत चव्हाण, बाल्या तायडे, गणेश चौव्हाण, बबलू शिंदे, अश्फाक शाहा, मदन कथलकर, बंटी घोडेस्वार, हरी भस्मे, चंदू मोरे, संजय ठाकरे, संजय काळे, नंदेश्वर, इम्रान खान, नितीन घंटेवार तसेच सर्व मित्रमंडळी सहभागी झाले होते.
युवकांनी “जय भीम”च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले. सामाजिक ऐक्य, शिक्षणाचे महत्त्व आणि संविधानाची जपणूक याबाबत संदेश देण्यात आला.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांचा जागर करत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.












