वेणी गणेशपूर ते धामणगाव देव येते दरवर्षीप्रमाणे पायदळ पदयात्रा दिनांक 20/02/2026 ते पुण्यतिथी दिनांक24/02/26
हे यवतमाळ जिल्यातील नामांकित देवस्थान असलेले मुंगसाजी माऊली धामणगाव देव मानून प्रसिद्ध असलेले देवस्थान आहे.या ठिकाणी ही पुण्यतिथी नीमित्या हा सोहळा साजरा केला जातो. ही पायदळ वारी वेणी गणेशपुर या गावातून निघत तरी पालखीचे अध्यक्ष म्हणून नेमलेले सोमेश्वर भाऊ गभणे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 45 वर्षापासून पालखी निघत आहे. तरी या गावांमध्ये वेणी गानेशपुर व कनी मिर्झापूर येथील भाविक मंडळींचा समावेश असतो. या मध्ये अंदाजे 250 ते 300 भाविक मंडळीच समवेश असतो.
गणेशपूर ते व धामणगाव देव या मार्गात येणारे गाव समाविष्ट आहे . जसे सालोट शिवरा ब्राह्मणवाडा पांढरी लोई बोधेगाव कोहळा व धामणगाव या गावामधील भाविक मंडळींचा सुद्धा समावेश असतो. वेणी ते धामणगाव देव हा मार्ग अंदाजे 90 ते 100 की. मी अंतराचे आहे. हे ऐकून अंतर तीन दिवस मध्ये पूर्ण करावे लागते. हा सोहळा पारंपरिक व भावनिक रित्या जुळलेला असून या मध्ये गावकरी मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळतो .त्यामुळे हा सोहळा शांततेत पूर्णत्वास येतो.











