मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पिंपळखुटा ग्रामपंचायतीत विविध उपक्रमांचे आयोजन

0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत रक्तदान शिबिर, सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, ग्रामस्वच्छता मोहिम तसेच लोक सहभागातून वृक्षारोपण करून त्यांच्यावर ट्री गार्ड बसविण्याचे काम करण्यात आले.

या कार्यक्रमांना मुख्याधिकारी बायस, पंचायत समिती अमरावतीचे विस्तार अधिकारी गवई यांनी भेट देवून सुरू असलेल्या रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणीची पाहणी केली. तसेच उपक्रमांची अंमलबजावणी पाहण्यासाठी मुख्य अधिकारी बायस आणि डेप्युटी सीईओ यांनीही भेट दिली. डेप्युटी सीईओ यांनी स्वतः वृक्षारोपण करून त्यावर ट्री गार्ड बसवले आणि ग्रामपंचायत पिंपळखुटा येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाड व सरपंच राऊत, उपसरपंच पद्मा मेश्राम, सचिव पल्लवी रंगारी तसेच सर्व सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुरज गंथळे यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याने त्यांचेही यावेळी खास कौतुक करण्यात आले. अनेक वृद्ध नागरिक, महिला, पुरुष तसेच विद्यार्थ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे राबविण्यात आलेले हे उपक्रम ग्रामविकास आणि आरोग्य जनजागृतीसाठी मोलाचे ठरले.

veer nayak

Google Ad