से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न..

0
140

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे दिनांक 9 ते 11 डिसेंबर शालेय स्नेहसंमेलन मोठ्या थाटात पार पडले. या चार दिवसाच्या दरम्यान विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मैदानी खेळ, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पुष्परचना प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, कौन बनेगा एस.एफ.एल . जिनियस, हस्ताक्षर स्पर्धा, प्रतिभांकुर या वार्षिकअंकामध्ये उत्कृष्ट चित्र रेखाटन, लेख, कविता स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.. सोबतच दहावी व बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुद्धा पारितोषिक देऊन गौरवण्यात आले..

या पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव व से.फ. ला.शाळा समितीचे अध्यक्ष एड.आशिषजी राठी तसेच विशेष उपस्थिती धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. असितजी पसारी तथा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गिरीशजी ताथोड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दत्तापूर, धामणगाव रेल्वे विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर विद्यालयाचे संमेलन प्रभारी कैलास चौधर, समीर हिरुरकर व विद्यालयाचा संमेलन कार्यवाह श्याम ठाकरे , संमेलन सहकार्यवाह देवेश साळुंखे , विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. अमृता खोब्रागडे या सर्वांनी विद्यालयात असणाऱ्या कलादालनांना व विज्ञान प्रदर्शनीला भेट दिली. प्रमुख अतिथींच्या हस्ते संस्था संस्थापक स्व. श्री. श्रीनारायणजी अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते..

 

 या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक नारायण सुरंदसे आणि त्यांच्या गानवृंदांनी सरस्वतीस्तवन सादर केले.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथींचा परिचय विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी करून दिला. वरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले… प्रमुख अतिथी गिरीशजी तथोड यांचा स्मृतिचिन्ह देऊन व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. सतत वाचन करावे. विद्यार्थी म्हणजे देशाचे आधारस्तंभ आहेत. अशाप्रकारचे मौलिक मार्गदर्शन प्रमुख अतिथीनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात भाग घ्यावा. तुम्ही विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहात.

याबद्दल मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलनांअंतर्गत विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला..

 

 यावर्षीचा स्टुडन्ट ऑफ द इयर चा अवार्ड प्रसाद अंबुलकर वर्ग 10 वा या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात आला..

 या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक अक्षय नवघरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन समीर हिरुरकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल लाहोटी यांनी केले. व या कार्यक्रमाचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

 दिनांक – 10 डिसेंबर 2025

veer nayak

Google Ad