धामणगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे “संघटन सृजन अभियान” जोमात कार्यकर्त्यांच्या मुलाखतींनी चांदुर रेल्वे उत्साह

0
47

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत अधिक घट्ट करण्यासाठी आणि आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यभर ‘संघटन सृजन अभियान’ राबविले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून आज चांदूर रेल्वे येथील आनंद सभागृह येथे धामणगाव विधानसभा मतदारसंघाची अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला मिळालेला ८०० हून अधिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून काँग्रेसची या मतदारसंघातील पकड किती मजबूत आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

नेत्यांचे मार्गदर्शन व पक्षबांधणीवर भर:
या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार मा. ना. यशोमती ठाकूर यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, “काँग्रेस हा केवळ पक्ष नसून ती एक विचारधारा आहे. आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथ स्तरावर सक्रिय होणे ही काळाची गरज आहे.” याप्रसंगी अभियानाचे मुख्य निरीक्षक मा. श्री. भाई जगताप आणि मा. श्री. आफताबजी अहमद यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षीय शिस्त आणि आगामी संघटनात्मक बदलांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्ह्याचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष मा. बबलुभाऊ देशमुख आणि माजी आमदार मा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनीही आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. यावेळी निरीक्षक मा. श्री. संजयजी दुबे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

मुलाखती आणि संवाद:
आनंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात केवळ भाषणेच झाली नाहीत, तर निरीक्षकांनी तासनतास बसून स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुकांच्या थेट मुलाखती घेतल्या. मतदारसंघातील प्रत्येक गावाची राजकीय परिस्थिती, बुथ कमिटीची रचना आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. ८०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे सभागृह पूर्णपणे ओसंडून वाहत होते.

विविध सेलचा सक्रिय सहभाग:
या बैठकीत युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय (NSUI), सेवादल आणि ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. प्रत्येक सेलच्या प्रतिनिधीने आपल्या विभागाचा प्रगती अहवाल निरीक्षकांसमोर सादर केला.

या भव्य मेळाव्यामुळे धामणगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन अशोकराव चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीकांतजी गावंडे, गोविंदराव देशमुख, गणेश जी आरेकर, अमोल होले, परीक्षित जगताप, पंकज वानखडे, प्रवीणजी घुईखेळकर, समीर पाटील, अमोल धवसे, विनोद चौधरी, श्रीनिवास सूर्यवंशी प्रभाकरराव वाघ, शिट्टु दादा सूर्यवंशी, अरुणराव शेळके, प्रशांत कोल्हे, प्रवीण चीनचे, नितीन कोपरकर, पवन चौधरी, संजय डुकरे बाळासाहेब ठाकरे, सुधीर नालगे, गजानन गोरडे, हरिभाऊ ठाकरे, अनिल भाई सौदागर, नितीनजी गोंडाने, नितीन दगडकर, सुरेश जी निमकर, अनिताताई मेश्राम, गजानन पाटील, शैलेश निस्ताने, नंदकुमार मानकर, चंदू डहाणे, अविनाश इंगळे, मुकुंद मावरे, भाऊराव बमनटे, मयूर दुबे, ऋषी जगताप, आशिष शिंदे, गजानन चौरे, महादेव सोमसे, रियाज भाई, राहुल गुल्हाने, सविता रंगारी, जोशनाताई धावसे, नरेंद्र थोरात, अमोल गुल्हाने, विनोदजी चौधरी, सुनील जी शिरभाते, दीपक सवयी, सुधीर पाटेकर, सुशील थोरात, मोरेश्वर डीवटे, देवेंद्र सव्वालाके,सलीम पठाण, देवानंद खुणे, प्रफुल कोकाटे, स्वप्निल मानकर, प्रतीक भाईचे,रुपेश पुडके सारंग देशमुख, राजू लांजेवार, सागर गरुड, वैभव चुकेकर, रितेश शेळके, भीमराव पवार, सागर भोंडे, गोपाल अविनाशी, राहुल राऊत, इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad