जिजाऊ ब्रिगेड आर्वीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, पुज्यनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्योत्स्ना चकोर यांच्या घरी उत्सवात साजरी करण्यात आली.

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, : कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व सदस्य महिला व पदाधिकाऱ्यांनी महामानवाच्या प्रतिमेचे हारार्पन व दिपप्रज्वलन करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायाताई शिरभाते यांनी केले जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष अंॅड. अलका काळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिन्दु कोड महिलांच्या अधिकारांसाठी कशा प्रकारे पास केले ही माहिती दिली…

सचिव मायाताई चौधरी यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. प्रसिद्धी प्रमुख वैशाली पायले यांनी क्रांतिसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांच्या जिवनकार्याबद्दल माहीती दिली. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष सुनिता जाणे यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या ज्ञानसुर्य, भारतरत्न, महामानव यांनी मनुस्मृती का जाळली या बद्दल माहिती दिली. तसेच गुलामगिरी विरूद्ध आवाज उठवून ज्यांनी क्रांती घडवली अविद्येचा अंधार सारून स्त्रियांना ज्ञानाचा प्रकाश दिला अशा थोर महात्मा फुले यांच्या जिवनकार्याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की महात्मा फुले लिखित गुलामगिरी हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा निस्ताने यांनी केले. आभार प्रदर्शन निता पोटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता कडु, अॅड. रुपाली ठाकरे,वर्षा चोरे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad