छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्वाची धगधगती मशाल – प्रा.निखिल मोहोड साई वस्तीचे विशाल हिंदू संमेलन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न . 

0
8

धामणगाव रेल्वे,

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र वेगवेगळ्या उदाहरणासह स्पष्ट करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व महाराजांनी केलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना व छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे प्रत्येक घराघरापर्यंत वाचले गेले पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्वाची धगधगती मशाल होते 

व्यवस्थापनाचे गुरु नेतृत्व कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याची प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रा.निखिल मोहोड यांनी व्यक्त केले. 

स्थानिक साई वस्ती या भागाचे विशाल हिंदू संमेलन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न झाली 

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्त परायण विठ्ठलदादा काठोळे, अमरावती येथील प्राध्यापक निखिल मोहोड, आणि माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामदास हाडे,संयोजक योगिराज थाळे सहसंयोजक :- प्रदीप बोडणे, मंचावर उपस्थित होते 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्कूल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा संगीत शिक्षक गौरव देवघरे यांच्या नेतृत्वात सादर केला. सौ.दगडकर यांनी पाळणा गीत सादर केले त्यानंतर एक छोटी नाटिका उपस्थितांच्या समोर सादर करण्यात आली. सुभेदार रामदास हाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ह.भ.प विठ्ठलदादा काठोळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून अध्यात्म हिंदुत्व संघ आणि हिंदू सम्मेलन याची प्रसंगीकता समोर ठेवली. प्रास्ताविक गजानन दुधे यांनी केले तसेच सूत्रसंचालन हेमंत निस्ताने व आभार प्रदर्शन भूषण कांडलकर यांनी मानले

veer nayak

Google Ad