सावित्री बाई फुले जयंती व जिजामाता जयंती निमित्ताने एक दिवसीय महिला मेळावा मांडवा येथे संपन्न

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूररेल्वे तालुक्यातील मांडवा येथे गावातील महिला बचत गट व ग्रामसंघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे समता दूत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान अमृत महोत्सव अंतर्गत संविधान साक्षर ग्राम मांडवा येथे एक दिवसीय महिला मेळावा सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमा च्या.अध्यक्षा गावच्या सरपंच सौ प्राजक्ता ताई इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून ऍड सरोज आवारे, (सामाजिक न्याय विभाग). समतादूत सलीम खान के.पठाण, आकाश मोटघरे (रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन).प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.सौ.अनिता धूर्वे (लेखिका). अँड दिपाली येळणे. सौ . सरलाताई भगत ( सामाजिक कार्यकर्त्या). मंचावर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले या नंतर मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले.या नंतर कार्यक्रमांचे प्रास्ताविक सौ चित्रा खडसे यांनी केले या नंतर महिलांच्या मुलाच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी गीत गायन, नृत्य,भाषण , नाटिका, वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या या नंतर प्रमुख अतिथी अँड सौ सरोज आवारे यांनी महीला सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले.या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी चे समतादूत सलीमखान के पठाण यांनी अधोरी प्रथा नरबळी कायदा 2013. या विषयावर मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सौ अनिता धुर्वे यांनी सवितीबाई फुले आणि महिला या विषयांवर मार्गदर्शन केले या नंतर ऍड सौ दिपाली येळने यांनी कायदे विषयक मार्गदर्शन.या नंतर आकाश मोटघरे सर यानी संवादाचे महत्त्व आणि शालेय मुलांना करियर मार्गदर्शन या वर प्रकाश टाकला.या नंतर सरला ताई भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सरपंच सौ प्राजक्ता इंगोले यांनी जन जागृती पर कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. संविधान साक्षर ग्राम अंतर्गत मांडवा गट ग्रामपंचायत परिसरात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाला गावातील नागरिक,महीला बचत गटांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच,ग्रामसेवक,मुख्याध्यापक. अंगणवाडी सेविका, ग्रामसंघ सदस्य यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रम हा महासंचालक बार्टी पुणे श्री.सुनील वारे आणि डॉ्. बबन जोगदंड विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनात आणि प्रभारी प्रकल्प अधिकारी अनिता राऊत यांच्या सहकार्याने घेण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन सौ किरण फरकाडे तर आभार प्रदर्शन अनिता भुसारी यांनी मानले .या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले .

veer nayak

Google Ad