सावंगा विठोबा नगरीत “पौष मास-अमावस्या” निमित्त “चंदन उटी व रमणा” आणि “पौष मास- मांड वाढवा” उत्सव

0
12

अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दि.२९/१/२०२५ बुधवार रोजी दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने पौष मास अमावस्या निमित्त “चंदन ऊटी व रमणा” उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

          चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविक भक्त आणि समस्त गावकरी मंडळी करिता ” भव्य महाप्रसाद ” कार्यक्रम महाप्रसाद दाते अनिल राऊत,नागपूर यांचे स्व खर्चाने आणि संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजित करण्यात आला आहे.

               संस्थानमध्ये दि.३०/१२/२०२४ ते दि.३०/१/२०२५ पर्यंत संस्थान तर्फे “पौष मास” निमित्त “अखंड जागृती भजन” मांडीचे आयोजन करण्यात आले होते. या मांडीचा वाढवा दि ३०/१/२०२५ गुरुवार रोजी सकाळी ९.०० वाजता महाराजांचे अरज आणि आरतीने विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्त यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे

              श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे दररोज सकाळी १०.०० वाजता चांदुर रेल्वे बसस्थानक मधून नियमित बससेवा सुरू आहे. तसेच दर रविवारी आणि शासकीय सुटीच्या दिवसी सकाळी १०.०० वाजता व सायंकाळी ५.०० वाजता चांदुर रेल्वे आणि सकाळी ११.०० वाजता व सायंकाळी ६.०० वाजता अमरावती बसस्थानक येथून बससेवा सुरू राहील,तरी अवैध वाहनांनी प्रवास न करता भाविकांनी बससेवेचा लाभ घ्यावा.

         तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामण रामटेके,गोविंद राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,लक्ष्मण राठोड वैभव मानकर, स्वप्निल चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad