एस ओ एस कब्स धामणगाव रेल्वे*येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) उत्साहात साजरा

0
6

धामणगाव रेल्वे | दि. १२ जानेवारी २०२६ —

एस ओ एस कब्स, धामणगाव रेल्वे येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्कार, राष्ट्रभक्ती आणि आत्मविश्वास यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. 

प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान आणि शिक्षिका अश्विनी नांदने यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, “राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांतून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे आहेत.

केजी 1 चा विद्यार्थी प्रियांश लोढा याने स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारली. तसेच ध्रुवी जगधने हिने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली.

या कार्यक्रमाचे आयोजन प्री. प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रणिता जोशी, रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदने, स्नेहल दुर्गे व ऋचा अडवलकर यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad