|| जय शिवाजी, जय किसान ||

0
2

छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासह महान विभूतींचा महाराष्ट्र..
1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि जागतिक पातळीवर उच्चांकी कामगिरी करत असलेल्या भारत देशाच्या गौरवशाली वाटचालीत महाराष्ट्र योगदान देऊ लागला. पुरोगामी विचारांचा, महिला सबलीकरणाचा, स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा, बालविकासाची चळवळ वेगाने पुढे नेणारा, न्याय- समता- बंधुता ही शिकवण कृतीतून पाळणारा आपला महाराष्ट्र गतीने पुढे जात आहे..

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि बळीराजा (शेतकरी) यांचे नाते अत्यंत अतूट आणि आदर्श मानले जाते. शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि त्यांच्या शेतीला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले होते. बळीराजा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा शब्द, जो ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखला जातो. शेतकरी उन, पाऊस, थंडी सोसून, रात्रंदिवस काळ्या आईची सेवा करून समाजासाठी अन्नधान्य पिकवतो…
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा -अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विदयालयाच्या दर्शनी फालकावर “गर्जा महाराष्ट्र माझा” चे चित्र रेखाटन केले आहे…

veer nayak

Google Ad