आर्वी लगत असलेल्या सावळापूर येथे पोलिसांची वॉश आउट मोहीम. पोलिसांची चाहूल लागताच राज मेश्राम जंगलाच्या दिशेने पसार

0
153

एकुण 3,37,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्ती पंचनामा करून जागीच दारू साठा नस्ट

 आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : मा. सौरभ अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेशान्वये आज दिनांक 09.01.2026 रोजी वॉश आउट मोहीम असल्याने मुखबिरकडुन खात्रीशिर माहिती मिळाली कि, मौजा सावळापुर येथे राहणारा राज मेश्राम हा मौजा मिरापुर शेत शिवारात गावठी मोहा दारु तयार करण्याकरीता दारुची भट्टी लावुन दारु गाळीत आहे. अशा प्राप्त माहीतीवरुन आज दिनांक 09/01/2025 रोजी सकाळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले व मा. पोलीस निरीक्षक सतिश डेहनकर यांचे मार्गदर्शनात पो. हवा. सागर गिरी, विनायक घावट, निरज लोही, ना.पो.शी. सुरेंद्र कांदे, विनोद मस्के, निलेश चव्हान, सुरज मेढे, बालाजी मस्के व दोन पंच असे मौजा मिरापुर शिवारात गेले असता राज मेश्राम रा. सावळापुर हा तेथे दारुची भट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असतांना दिसुन आला. पोलीस स्टॉफ त्याचे दिशेने जात असतांना त्यास पोलीस आल्याची चाहुल लागतचा तो जंगलाचे दिशेने पसार झाला.

मोक्क्यावरुन 01) 09 लोखंडी ड्राम मध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 1800 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर 150 रु. प्रमाणे 2,70,000 रु, 02) 02 लोखंडी भट्टी ड्रम मध्ये प्रती ड्रम 100 रु प्रमाणे 200 लिटर उकळता मोहा सडवा रसायन प्रति लिटर 150/- रुपये प्रमाणे 30,000 रुपये 03)06 प्लास्टिक डबकीमध्ये प्रति डबकी 10 लीटर प्रमाणे 60 लीटर गावठी मोहा दारु प्रति लीटर 200/- रु प्रमाणे 12,000/- रुपये 04) 11 लोखंडी खाली ड्रम प्रती ड्रम 2000/- रु प्रमाणे 22,000/- रुपये व 01 खाली प्लास्टीक ड्रम कि. 1000/- रुपये असे एकुन 23,000/- रुपये 05) दोन जर्मन घमीले प्रती घमेले 500 रु. प्रमाणे 1000/- रुपये 06) ईतर भट्टी साहीत्य 1000/- रुपये असा एकुण जुमला किंमत 3,37000 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने घटनास्थळी जप्ती पंचनामा कारवाई करुन ताब्यात घेतला. पुर्ण मुद्देमाल जागीच नस्ट केला.

veer nayak

Google Ad