जळका जगताप जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा माता पालकांसह विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद ; प्रवेशित विद्यार्थ्यांची विकास पत्रात घेतली नोंद

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे,ता.२७:- तालुक्यातील जळका जगताप जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.या मेळाव्यात माता पालकांसह इयत्ता पहिलीत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

शाळेत जाण्यापूर्वी पहिलीत दाखलपात्र मुलांची माता / पालक घरीच शाळापूर्व तयारी करून घेतात. ज्यामुळे पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यक पूर्वतयारी होते आणि विद्यार्थ्यांना पुढील अध्ययन करणे सुलभ जाते.शाळांना या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात व यशस्वितेचा अनुभव असल्याने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्याची शाळापूर्व तयारी करून घेण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम शाळामध्ये राबविण्यात येत आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीचे प्राचार्य मिलिंद कुबडे,शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ,शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण,किरण पाटील,गटसमन्वयक मंगेश उल्हे,विषय साधनव्यक्ती श्रीनाथ वानखडे,अश्विनी पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली

जळका जगताप जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे औक्षण करून सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट तयार केला. दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. नंतर विद्यार्थ्यांच्या पूर्व ज्ञानावर आधारीत शारीरिक, बौद्विक, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी या क्षमतांची चाचणी घेण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
————
शाळा पूर्व तयारी मेळाव्यात शाळा स्तरावर एकूण सात स्टॉल तयार करण्यात आले होते. या प्रसंगी प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची बडबडगीते व नृत्य, खेळ घेण्यात आले.अत्यंत आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेऊन पुढील दीड महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घ्यायची, याबाबत पालकांशी चर्चा करण्यात आली.

प्रसाद संकपाळ,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे
—————
शैक्षणिक सत्र २०२६-२७ या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या बालकांची शाळा पूर्वतयारी झालेली असते, त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता पहिली ला दाखल पात्र बालकांची शाळा पूर्वतयारी व्हावी व त्यांचे शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे याकरिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे.

किरण पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे
————-

veer nayak

Google Ad