क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

0
10

राजर्षी शाहू सायन्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समिती व राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर वडनेरकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन हार अर्पण व दीप प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तथा विद्यार्थी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 3 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत आयोजित उपक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा लेक शिकवा’ या अभियाना अंतर्गत प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी डॉ. जी बी संतापे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ रोशनी भगत, सांस्कृतिक समितीचे समन्वयक श्री प्रवीण चव्हाण, सहसमन्वयिका एस एम देशमुख, सहसमन्वयक श्री पी आर देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आले.

veer nayak

Google Ad