आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस समारंभ आणि सांस्कृतिक उत्सव रोशन मंगल कार्यालय आर्वी येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रवीण पावडे,प्रमुख अतिथी भारत व कृषक संस्थेच्या अध्यक्षा अँड.शोभाताई काळे, एडवोकेट प्रकाश धारपुरे, माजी प्राचार्य प्रा अभय दर्भे,माजी प्रा चंद्रकांत पाटील,प्रा गोपाल निनावे, माजी विद्यार्थी बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक आशिष माहुरे , कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्रा अनुराधा काळे, प्रा सुरेंद्र मेघे प्रा नितीन ठाकरे .सांस्कृतिक प्रमुख प्रा निलेश पांढरे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेमध्ये व विषयामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला
माजी विद्यार्थी आशिष माहुरे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
अँड.शोभाताई काळे यांनी वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाना चालना मिळते. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा विकास करावा असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा अभय दर्भे यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या .
प्रकाश धारपूरे यांनी विद्यार्थ्यांना काळ व परिस्थितीनुसार कौशल्य विकसित करा असे सांगितले. प्रा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थीआशिष माहुरे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्याकरता पुढील तयारी करावी असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मनोज नेवले व आभार प्रा. सौ. माळोदे ह्यांनी मानले.कार्यक्रमाला पालक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमात ,पोवाडा ,लोकनृत्ये,नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या.











