कृषी शिक्षणाला प्रशिक्षणाची ची जोड – राजर्षी शाहू सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शासकीय रोपवाटिकेत अभ्यास दौरा ग्राफ्टिंग, बडिंग, गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक; ६० विद्यार्थ्यांना मिळाले तांत्रिक ज्ञान

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्थानिक राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे येथील बी.एस्सी. वनस्पती शास्त्र विभागाच्या भाग १ व भाग २ च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या फळ रोपवाटिका, चांदुर रेल्वे येथे शैक्षणिक भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीत एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांचे स्वागत करून उपकृषी अधिकारी मा. शिंदे सर व रोपवाटिकेचे सहअधिकारी मा. चतुर सर यांनी संपूर्ण रोपवाटिकेची पाहणी घडवून आणली. या शैक्षणिक भेटीचे दोन सत्रांमध्ये नियोजन करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात मा. शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना फळ रोपवाटिकेची रचना, नर्सरी लेआऊटचे महत्त्व, विविध जातींच्या झाडांची नावनोंदणी पद्धत व ग्रीन हाऊसमध्ये कोणती रोपे ठेवावीत याबत सविस्तर माहिती दिली. फळबाग लागवडीसाठी लागणारी कलमे कशी तयार करतात, याचे शास्त्रीय महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या सत्रात मा. चतुर सर यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. यामध्ये ग्राफ्टिंग, बडिंग, रूट कटिंग, स्टेम कटिंग, लीफ कटिंग व पॉटिंग कसे करायचे हे स्वतः करून दाखवले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याकडून आंबा, मोसंबी, संत्री, लिंबू, पेरू, इडिलिंबू या फळझाडांवर कलम बांधणी करून घेतली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कृतीमध्ये सहभाग घेतला.

याशिवाय रोपवाटिकेतील गांडूळ खत निर्मिती युनिटला भेट देऊन सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खताचे महत्त्व व त्याची निर्मिती प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी विशेष प्रभावित झाले.
या शैक्षणिक भेटीचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. संपदा पी. पाथरकर यांनी केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.पी.आर.वडनेरकर सर व आयक्यूएसी समन्वयक श्री. वाणी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रा. पाथरकर यांनी सांगितले की, “पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांचा विषयातील आत्मविश्वास वाढतो. भविष्यात कृषी उद्योजक घडवण्यासाठी अशा भेटी महत्त्वाच्या आहेत.”

विद्यार्थ्यांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. बी.एस्सी. भाग २ च्या एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्ही वर्गात फक्त आकृत्या बघितल्या होत्या. आज स्वतःच्या हाताने कलम बांधता आले, हा अनुभव अविस्मरणीय आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः काही प्रात्यक्षिकं करून समृध्द असा अनुभव घेतला व या अभ्यास भेटी बद्दल समाधान व्यक्त केले

veer nayak

Google Ad