धामणगाव (प्रतिनिधी) –
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वे कर्मचारी संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
दि. ११ एप्रिल २०२६ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत सहा दिवसीय विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये चित्रकला, निबंध लेखन, गायन, नृत्य, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. महिला, पुरुष व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


दि. १६ एप्रिल २०२६ रोजी बक्षीस वितरण व भोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. विक्रांत घरडे तसेच सिद्धार्थ खंडेराव , सचिन बोंद्रे, धम्मा इंगोले, त्रिशूल कांबळे यांच्यासह इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. भीमराव गणवीर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रेल्वे कर्मचारी संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले.











