प्राचार्यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. अशोक कला व वाणिज्य महाविद्यालय ; प्राध्यापकांची पत्रकार परिषद

0
2

चांदूर रेल्वे:- शहरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण देणारे शहरातील पहिले कॉलेज म्हणून ओळख असलेले अशोक महाविद्यालय मागील अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अटकले असून तेथील प्राचार्य जयंत कारमोरे व संस्थेच्या संचालकांचे नातेवाईक यांचा मिळून कॉलेज च्या विद्यार्थ्यांना व इतर प्राध्यापकांना प्रचंड मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा.तपोवन पाटील व प्राध्यापिका डॉ.माया वानखडे यांनी आज ता 14 शनिवार रोजी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

 

 

प्राचार्य डॉ जयंत कारमोरे यांच्या विविध वादग्रस्त वागणुकी मुळे १० जुलै २०२४ रोजी शासनाने महाविद्यालयात प्रशासनाची नियुक्ती केली होती, व प्रशासनाने डॉ कारमोरे यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याने वैद्यकीय तपासणी साठी सक्तीच्या रजेवर पाठवून ३० दिवसात वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्याचे निर्देशे दिले होते व डॉ माया वानखडे यांच्याकडे प्रभारी प्राचार्याचा कार्यभार सोपविला होता, त्यावर डॉ कारमोरे यांनी न्यायालयीन स्थगिती मिळविली व पुन्हा महाविद्यालयात रुजू झाले व महाविद्यालयात सर्वांसाठी नोटीस काढून सांगितले की प्राचार्य मीच असल्याने कागदपत्रावर माझेच सही घ्यावी असे असताना आज विद्यार्थी त्यांचे कागदपत्र घ्या साठी येत असताना प्राचार्य कारमोरे मी चार्ज घेतला नाही असे सांगत विद्यार्थ्यांना सही व कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेला उपस्थित प्राध्यापकांनी केले. त्यासाठी विद्यार्थी पोलीस स्टेशनकडे जाऊन तक्रार करीत असल्याचेही समजते. एकीकडे आपण चार्ज घेतलेला नाही असे सांगून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास द्यायचा आणि दुसरीकडे प्रचार्यांच्या नावाने सुचना काढायच्या याला काय समजाव, प्रशासकांच्या आदेशाने आपण प्राचार्य कारमोरे यांना चार्ज व सर्व कपाटांच्या चाब्या दिल्या असून ते मिळाल्या नसल्याचे सांगत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान यात होत असल्याचा आरोप प्रा पाटील व प्रा वानखडे मॅडम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
——–
मला प्रशासकांनी अधिकृत प्रभार द्यावा- प्राचार्य कारमोरे
मला सक्तीच्या रजेवर प्रशासकाने पाठविले आहे, त्यांनीच कपाटे फोडून चार्ज घेतला तेव्हा आता जेव्हा कोर्टाने प्रशासकाच्या आदेशाला स्थगिती दिली तेव्हा मला प्रशासकनेच पुन्हा प्रभार द्यावा मी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते चार्ज कसा घेणार असा उपप्रश्न सुद्धा आरोपांवर उत्तर देतांना प्राचार्य कारमोरे यांनी विचारला.

veer nayak

Google Ad