एबी फॉर्मची पळवा पळवी करणाऱ्यांच्या प्रचार सभेला काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथील आर्वी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये चुप्या मार्गाने केलेल्या काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी नाकारली नसून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नागरिकांनी सुद्धा अशा या युतीला मान्य केले नाही. याचा पडसाद 25 इच्छुक व 1 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. आता या काँग्रेस राष्ट्रवादी युतीच्या प्रचार सभेला काँग्रेस नेते येतील का? हा देखील अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. अखेर खरे काँग्रेस विचारधारेवर चालणारे नेते या प्रचार सभेला बहिष्कार तर टाकतील नाही ना? अनंत बाबूजी मोहाेड यांच्या नेतृत्वात काँग्रेस उभी होत असल्याचे काही पूर्व काँग्रेसच्या नेत्यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश घेऊन आर्वी तालुक्यात काँग्रेस वाढत दिसत असल्याने पोटात दुखणे सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनंत मोहोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसची एक नवीन फळी निर्माण झालेली आहे. तेच पूर्व काँग्रेसच्या काही नेत्यांना दुसऱ्या पक्षात जाऊन वाढतं काँग्रेस पक्षाच वटवृक्ष चांगलच सलत असल्याने नातेसंबंधाचा फायदा घेत काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना हाताशी घेऊन पक्षातच कशी फुट निर्माण करता येईल याचे प्रयत्न करत आहे. म्हणून अशा चुप्या युतीच्या प्रचाराला एकनिष्ठ विचारधारेवर चालणारे काँग्रेस नेते येणार तरी कोण असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे.
—————————————-
30/11/2025 रोजी झालेल्या सभेत तर काँग्रेसचा कोणताही मोठा नेता प्रचाराला आलेला नाही. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे असलेले उमेदवार हे बेघर असल्याचे दिसून आले. म्हणूनच प्रचार सभेला देखील मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवली असून यावर देखील अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांसह राजेंद्र मुळक यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की प्रोटोकॉल नुसार एबी फॉर्म हे शहराध्यक्षाकडे द्यायला पाहिजे हाेते. परंतु चुकीच्या व्यक्तीकडे एबी फॉर्म दिल्यामुळे जिल्हाध्यक्षा विरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा प्रकार आवडला नसल्यामुळे प्रचार सभेला मी नसल्याचे स्पष्ट सांगितले होते.
शैलेश अग्रवाल
काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक तथा
प्रदेश कार्यकारी समितीचे प्रतिनिधी









