मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह स्व-गणना करून भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला.

यावेळी महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.














