प्रतिनिधी:-
धामणगाव रेल्वे :-तालुक्यातील गिरोली शिवारात मंगरूळ दस्त -पुलगाव रोड वरील रेल्वे गेटजवळ अमरावतीच्या तरुणाचा थंडी च्या कडाक्याने मृत्यू झाला. मृतकाची ओळख पटली असून सदर युवक नामे.हरीश किसनराव पारवे वय -37वर्ष
धंदा -मजुरी रा कुऱ्हा अमरावती असे असून तो पुलगांव येथील बरांडा परिसरात राहत असलेल्या बहिणीकडे जातं असताना.दारूच्या व्यसनाधीन असल्यामुळे तो मधातच तळणी रेल्वे स्टेशन वर उतरून पायदळ रेल्वे लाईन ने पुलगाव कडे जातं होता. परंतु अति प्रमाणात नशा केल्यामुळे तो रेल्वे फटकाजवळ काम चालू असलेल्या पुलाच्या पिल्लर जवळ झोपला. थंडी खुप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा रात्री मृत्यू झाला. मंगरूळ दस्तगीर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचे प्रेत श्वविच्छेदन साठी पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनात मंगरूळ दस्त पोलीस करत आहे.











