धामणगाव रेल्वे/तळेगाव द.,
सर्वसामान्य हिंदू समाजाला आपल्याला जागृत आणि समर्थ पणे उभ करायच आहे सर्वसामान्य हिंदू सामर्थ्यवान बलवान होईल तेव्हाच भारत परम वैभवापर्यंत नक्कीच पोहोचेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ भाषणातूनच नव्हे तर १०० वर्षात संघाने कृती मधून हिंदू जागृती केलेली आहे त्यामुळे हेच कार्य आपण सर्वांनी केले तरच संघटित हिंदू समर्थ भारत तयार होईल असे प्रतिपादन धर्म जागरण अखिल भारतीय परियोजना प्रमुख श्याम हरकरे यांनी व्यक्त केले
ते तळेगाव दशासर येथे विराट हिंदू संमेलनात बोलत होते याप्रसंगी मंचावर सिताराम बाबा यांच्या परम शिष्या माहेश्वरी दीदी व ए.एम.पी.एस कॉन्व्हेंट चे अध्यक्ष जगत देवानंद अवधूत महाराज प्रामुख्याने उपस्थित होते
हरकरे पुढे म्हणाले की हिंदू समाजाला देशाला बलाढ्य आणि सामर्थ्यवान बनवण्याकरिता आता तीन कोटीच्या वर संत महंत महामंडलेश्वर एकत्रित होऊन या कार्यकर्ता मैदानात उतरले आहेत हिंदू समाजाला ताकतीने उभं करण्याचा निर्धार आणि संकल्प या तीन कोटी संत महंतांनी सुद्धा केलेला आहे आपल्या १०० व्या वर्षात पदार्पण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध उपक्रमांसोबतच विशाल हिंदू संमेलन घेण्याचा संकल्प केला आणि या अनुषंगाने संघाने समस्त सकल हिंदू समाजाच्या सहकार्याने एक लाखाच्या वर हिंदू संमेलन आजतागत घेतलेत पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात हिंदू संमेलन चालू आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५८ देशात हिंदू एकात्रीकरणाचे कार्य अविरत आहे तसेच संघाच्या ८५ हजाराच्या वर संघ शाखा कार्यरत आहेत हरकरे यांनी माहिती दिली की १९४७ ला भारतात ९०% हिंदू होते आणि स्वातंत्र्यानंतर आजची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आपली भूमि श्रीराम आणि श्रीकृष्णाची आहे या भूमिला इथल्या संस्कृतीला टिकवून ठेवणे हे हिंदूंचे परम कर्तव्य आहे आज देशात ७७ टक्के हिंदू आहेत ही परिस्थिती बदलविणे आवश्यक आहे अन्यथा परिणाम भोगाव लागेल त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंच तत्व गोष्टींचा महत्व उपस्थित महिला पुरुषांना सांगितले यात त्यांनी कुटुंब प्रबोधन,पर्यावरण, स्व तंत्र, नागरी कर्तव्य, समरसता विषय सविस्तरपणे मांडलेत
हिंदूंच्या जागृती करिता संघाचे अलौकिक असे कार्य आहे राष्ट्रीय संघ समाजाला जागवतो आहे हिंदू समाजाने जागृत होऊन या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे यशस्वी होतोय असे आशीर्वचन यावेळी माहेश्वरी दीदी यांनी याप्रसंगी दिले
बजरंग दलाचे विशाल तिरमारे यांनी जगत देवानंद अवधूत महाराज यांचे स्वागत केले
कार्यक्रमाचे संचालन दीप्ती ढाकूलकर प्रास्ताविक श्याम घाटे परिचय प्रा. विशाल मोकाशे आभार भारती चुटे यांनी मानलेत













