धामणगाव रेल्वे:- प्रतिनिधी
नाशिक येथील गुन्हेगार भोंदू मांत्रिक अशोक खरात यांच्या विषयी बोलताना स्वामी आनंद स्वरूप याने अनुसूचित जातीतील समाजाबद्दल अत्यंत आक्षेप अपमान जनक व असविधानिक विधान केले इतकच नव्हे तर त्यांनी मनुस्मृति व चातुरवर्णी व्यवस्थेचे समर्थन करत आंबेडकरी समाजाला अपमानास्पद शब्द संबोधले आहे. जे भारताच्या संविधानातील समता न्याय व बंधुत्व या मूलभूत मूल्यांना थेट विरोध करणारे आहे भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या व मानवी हक्काच्या विचारांवर अशाप्रकारे वक्तव्य करणे अत्यंत निंदनीय व अस्विकार्य आहे अशा प्रकारची विधाने समाजात तेड निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करतात स्वामी आनंद स्वरूप यासारखी व्यक्ती जाणीवपूर्वक समाजात द्वेष पसरवण्यासाठी व जातीय व्यवहार वाढवण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य करत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून विवेक विचार मंचाच्या वतीने आम्ही या वक्त्यात्वाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहे संबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर लागू कायद्यानुसार तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन विवेक विचार मंच अमरावती जिल्हा तर्फे मा.अभय घोरपडे साहेब तहसीलदार धामणगाव रेल्वे यांना देण्यात आले यावेळी प्रशांत मुन, रवी उर्फ दादू मेश्राम, प्रेम मोटघरे, अमोल देशभतार, सदानंद कांबळे, सिद्धार्थ टाले, आकाश मुन, संदिप रामटेके, कोहिनूर श्रीरामे उपस्थित होते.











