मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आठवड्यातील एक दिवस ग्राम स्वच्छतेसाठी हा उपक्रम पिंपळखुटा ग्रामपंचायत येथे संपन्न

0
93

 संत गाडगे महाराज यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच “स्वच्छता हीच सेवा” या संदेशाला ग्रामस्थांनी कृतीत उतरवले.

या प्रसंगी लोकसहभागातून ग्रामस्वच्छता करण्यात आली.तसेच गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी एक दिवस गावांसाठी हि संकलपणा राबविण्यात यावी असा संकल्प करण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व व समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी गाडगे महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवून महाराजांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये सचिव कु पल्लवी रंगारी सरपंच दिलीप राऊत उपसरपंच पद्मा मेश्राम ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस व श्री.संत शंकर महाराज विद्यामंदिर चे मुख्याध्यापक,विद्यार्थी, महिला बचत गट,सामाजिक कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad