तळेगाव दशासर (प्रतिनिधी) – प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दशासर अंतर्गत राष्ट्रीय हत्तिरोग नियंत्रण उपपथक यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गावात हिवताप जनजागृती रथ काढण्यात आला तसेच शाळकरी मुलांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली. या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये मलेरिया (हिवताप) आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य उपचार आणि आजार निर्मूलन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. पंकज खांडरे, श्री. अभिजित कांबळे (आरोग्य कर्मचारी) तसेच श्री. भूषण वठ्ठे, श्री. हरिदास इंगळे, श्री. श्रीकांत मानतुटे, श्री. अशोक दूधिवार, श्री. गजानन इंगोले (क्षेत्र कर्मचारी) यांनी विशेष परिश्रम घेतले.














