श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात आंतर शालेय विज्ञान संस्कार शिबिराचे आयोजन

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे येथे विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, नागपूर व श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरशालेय विज्ञान संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 24 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 च्या दरम्यान करण्यात आलेले आहे. दिनांक 24 एप्रिल 2026 ला सर्वप्रथम शिबिरार्थींची नोंदणी करण्यात आली व त्यानंतर विज्ञान भारती कडून प्राप्त साहित्यकिटचे वाटप करण्यात आले. शिबिरार्थींचे गट बनविण्यात आले असून विभा प्रार्थना व विभा गीताने दिवसाची सुरुवात करण्यात आली .त्यानंतर विज्ञान भारती व शिबिराबद्दलची विस्तृत माहिती शिबिरार्थींना देण्यात आली. याप्रसंगी उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ श्री. असितजी पसारी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता देशपांडे यांनी भूषविले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले आणि विविध प्रश्नांच्या माध्यमातून शिबिरार्थींमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा जागृत केली तर प्रमुख अतिथी डॉ. असितजी पसारी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शनात शरीर हीच एक प्रयोगशाळा असून विज्ञान आपल्या अवतीभोवती आहे व त्याकडे आपण डोळसदृष्टीने पाहिले पाहिजे असे मार्गदर्शन केले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी धामणगाव तालुक्यातील विविध शाळा सहभागी झालेल्या आहेत. त्यात से.फ. ला हायस्कूल , विद्यानिकेतन सी.बी.एस.ई स्कूल,छत्रपती विद्यालय, स्व. नंदलाल लोया कन्या विद्यालय यांचा समावेश आहे .शिबिरात एकूण 80 शिबिरार्थी सहभागी झालेले असून 40 स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहे. या शिबिरात विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानाचे प्रयोग हाताळण्याचा अनुभव देण्यात येत असून विविध तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आलेले आहे . याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. राठोड व पर्यवेक्षिका कु. टेंभुर्णे, विविध शाळेतील समन्वयक, शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. उमेश तुळसीराम अरबट यांनी तर आभार प्रदर्शन सौ.नम्रता वैभव पोतदार यांनी केले. सर्व शिबिरार्थींना अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad