ट्युशनशिवाय उज्ज्वल यश : वाठोडा बु. येथील इश्वरी गौरव जायले हिला आयटी विषयात दुसरा क्रमांक

0
46

वाठोडा बु. येथील रहिवासी व विद्यानिकेतन CBSE स्कूलच्या विद्यार्थिनी इश्वरी गौरव जायले हिने दहावीच्या CBSE पॅटर्न परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने कोणत्याही ट्युशनशिवाय स्वअभ्यासाच्या जोरावर 84 टक्के गुण मिळवत उत्तीर्णता मिळवली असून, माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागातील असलेल्या इश्वरीला दररोज शाळेसाठी अप-डाऊन करावे लागत होते. ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रस्त्याचीही सुविधा नसतानाही तिने सर्व अडचणींवर मात करत हे यश मिळवले आहे.
इश्वरीने नियमित अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. आई-वडील तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिने ट्युशनशिवाय हे यश मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व सहाध्यायी यांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इश्वरीचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे

veer nayak

Google Ad