नगरपालिका निवडणुकीत कर्मचाऱ्यासह मुख्याध्यापकांच्या ड्युटी तर शाळेची जबाबदारी घेणार कोण? 

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खाजगी विद्यालयातील उच्च विद्यालयातील कर्मचारी व मुख्याध्यापकांच्या निवडणूक कामात ड्युटी लावण्यात आले आहे त्यामुळे शाळेत कोणीच राहणार नसल्याने एकतर मुख्याध्यापकांना या निवडणूक कामातून मुक्त करा किंवा सळसकट ड्युटी लागलेल्या शाळेंना सुट्टी द्या आशयाचे निवेदन आर्वी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण सुकुलवाड यांची भेट घेऊन शाळांच्या परिस्थितीत नेमकी करायचे काय ? मुख्याध्यापकांच्या ड्युटी लागल्या तर शाळा सांभाळायची कोणी? याबाबत चर्चा केली व आज दुपारी बारा वाजता दिले… या निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प वर्धा, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आर्वी यांना पाठविण्यात आल्या आहेत 

____________

नगरपरिषध सार्वत्रिक निवडणूक २०२५ दिनांक ०२/१२/२०१५ रोजी होऊ घातलेल्या कार्या करीता ग्रामीण भागातील सर्व मुख्याध्यापक व शाळेतील कर्मचारी यांची मतदान पथकात केंद्राध्यक्ष व अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.

त्यांचे पहिले प्रशिक्षण गांधी विद्यालय येथे तारीख 26 ला दुपारी तीन ते साडेपाच दुसरे प्रशिक्षण तारीख 29 ला सकाळी दहा ते बारा ठेवण्यात आलेले आहे तसेच एक डिसेंबरला साहित्य वितरण नऊ वाजता करण्यात येणार आहे .

_______

परंतु ग्रामीण भागातील शाळेतील मुख्याध्यापकांना कार्यभार सांभाळावा लागत असल्याने तसेच ऑनलाइन शिष्यवृती, ऑनलाइन संच मान्यता, फेब्रुवारी मार्च २०२६ बोर्ड परीक्षा, १० वी व १२ वी चे वि‌द्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्याचे काम सुरु असल्यामुळे तसेच डिसेंबर २०२५ व २ डिसेंबर २०२५ शालेय कामकाज दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद ठेऊ शकत नाही. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. करिता या निवडणूक कामामध्ये शाळेतील कामकाजामध्ये अडचण निर्माण होईल करीता आपण ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांना निवडणूक कामापासून वगळण्यात यावे व त्यांचा आदेश रद्द करण्यात यावा

अन्यथा शिक्षणाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी त्या सबंधित शाळांच्या सर्वांच्या ड्युट्या लागले आहे त्यांच्या शाळेला सुट्टी घोषित करावी..

अशा आशयाची निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल गावित यांना देण्यात आले आहे

निवेदनावर अध्यक्ष संजय नांदे सचिव राजेश सोळंकी कोषाध्यक्ष प्राचार्य साहेबराव अवथडे, मुख्याध्यापक राजेश सुपणार रोहना ,मुख्याध्यापक सी,पी डेंगे भारसवाडा, मुख्याध्यापक एस एल कांबळे, मुख्याध्यापक पी.आर ठाकरे देऊरवाडा,मुख्याध्यापक एस आर लोखंडे मुख्याध्यापक नांदपूर , पी डब्ल्यू होरे मुख्याध्यापक धनोडी, आदी अनेक मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आहेत…

_________

मुख्याध्यापकांचे निवेदन प्राप्त झाले काही मुख्याध्यापकांच्या निवडणूक कार्यात केंद्राध्यक्ष आणि अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे परंतु सुट्या देण्याचा अधिकार आम्हाला नाही त्यांनी या संदर्भात शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करावी..

अनिल गावित 

निवडणूक निर्णय अधिकारी आर्वी 

____________

ग्रामीण भागातील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या आर्वी नगरपालिका निवडणूक कमी केंद्रध्यक्ष व अधिकारी म्हणून ड्युटी लावण्यात आले आहे.. त्यामुळे शाळेत कोण थांबणार विद्यार्थ्याकडे लक्ष कोण देणार एखादी घटना घडली त्याला जबाबदार कोण? त्यामुळे सरळ एक व दोन तारखेला ग्रामीण भागातील ड्युटी लागलेल्या शाळेत सुट्टी जाहीर करावी असे आमचे म्हणणे आहे..

पी.डब्ल्यू. होरे 

मुख्याध्यापक मॉडेल हायस्कूल धनोडी

—————

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार तुमच्या अधिनस्त असलेले कर्मचारी यांची नावे पाठवा असे पाठवले असता मुख्याध्यापकाची ड्युटी लावण्याचे कारण काय तेच कळेनासे झाले आहे.. माझ्यासह शिक्षक कर्मचाऱ्यांच्याही ड्युटी लागली आहे त्यामुळे शाळा बंद ठेवायची का ,हा प्रश्न आता निर्माण झाला.

सुपनार सर

मुख्याध्यापक रोहना

veer nayak

Google Ad