शिरजगाव कोरडे गावातील महिलांनी पकडले अवैद्य देशी दारू. पोलिसांचे काम करत आहे गावातील महिला. दारूबंदी विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत,

0
31

चांदुर रेल्वे / तालुक्यातील शिरजगाव कोरडे या गावातील उपसरपंच सह महिलांनी ता 22 रोजी सायंकाळी अंदाजे 7:30 वाजता गावात अवैद्यरित्या घरातून देशी दारू विकत असलेल्या पती-पत्नी च्या विरोधात तक्रार करून पोलिसा च्या साधीन केले, यावेळी गावातील 25 ते 30 महिला थंडीत रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसल्या होत्या,यावेळी अवैधरीत्या दारू विकणाऱ्या इसमाच्या घरा तून 11,100 / दारू पोलिसांनी जप्त केली, या अगोदर सुद्धा गावातील महिलांनी गावात अवैधरित्या देशी दारू विकणाऱ्या इसमाला पोलिसांच्या स्वाधीन केले होते मात्र सदर इसम हा व्यवसाय सोडत नसून यावेळी गावातील महिला आक्रमक झाल्या होत्या, यावेळी गावातील उपसरपंच संगीता बद्रे,ताराबाई सोनसागडे, रेश्मा भंडारी प्रतिभा चाचने, ऐश्वर्या चाचने,सह 25 ते 30 महिलां पोलीस स्टेशनवर हजर होत्या,

शहरासह तालुक्यात अवैद्य देशी दारू विकण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे ग्रामीण भागा सह शहरी भागातील महिला त्रस्त झाले आहे,तर दारूबंदी विभागा पासून पोलीस विभाग मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते,शहरातील अनेक भागात अवैद्य दारू बनवण्याचे प्रमाण वाढले असून सकाळी पाच वाजता पासून काही नागरिक अवैधरित्या दारू विकताना दिसत आहे मात्र या गंभीर बाबीकडे दारू बंदी विभाग डोळेझाक करत आहे,

दारूबंदी विभाग कुंभकर्ण झोपेत,

शहरातील अनेक भागात केमिकल युक्त दारू बनवण्यात येत आहे त्यामुळे आतापर्यंत अनेक युवक या केमिकल युक्त दारू चे बळी पडले आहे, दारूबंदी विभाग डोळे झाक करताना दिसून येते या विभागातील स्थानिक अधिकारी मात्र ऑफिसमध्ये आढळून येत नाही कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यास साहेब दौऱ्यावर केले असल्याचे कर्मचारी सांगतात

veer nayak

Google Ad