धामणगाव रेल्वे : एचपी गॅस सिलेंडरचा काळाबाजार, ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

0
137

धामणगाव रेल्वे शहरात एचपी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने काळाबाजार वाढल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी गॅस सिलेंडर जास्त दराने विक्री होत असून सामान्य ग्राहकांची लूट होत आहे. अधिकृत दरापेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांची तब्बल 2 किलोमीटरपर्यंत लांब रांग लागल्याचे पाहायला मिळाले. अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास उन्हात उभे राहावे लागत असल्याने गैरसोय वाढली आहे.

या प्रकाराकडे संबंधित प्रशासन आणि गॅस कंपनीने तातडीने लक्ष देऊन काळाबाजार थांबवावा तसेच पुरेशा प्रमाणात गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

— वीर नायक न्यूज नेटवर्क

veer nayak

Google Ad