से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन

0
11

धामणगाव रेल्वे- तालुका प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा, त्यांना करिअरच्या नव्या संधी माहित व्हाव्या, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने विद्यालयात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. याचाच एक भाग म्हणून विद्यालयात कनिष्ठ महाविदयालयातील अकरावी व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून धामणगाव रेल्वे परिविक्षाधीन तहसिलदार मा. श्री. हेमकृष्ण पिसदे उपस्थित होते. आपल्या तासभराच्या कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील त्यांचे अनुभव कथन केले. युपिएससी, एमपिएससी अभ्यासक्रमाची माहिती दिली. आपल्या संवाद शैलीने आणि अनुभव कथनाने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या अभ्यासविषयक अडचणींवर मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय ठरवून त्यावर मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिल्ला. यावेळी विचारपिठावर विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश कावलकर, संचालन सुशील नागपूरे व आभार अक्षय नवघरे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कु आरती भांगे, कु, निशा सोनी, श्री. अनुराग बाभूळकर, कु. रोमीला कडू, श्री माणिक वानखडे यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad