दि. ११ जानेवारी २०२६ (रविवार) रोजी जागतिक पारायण दिनानिमित्त धामणगाव रेल्वे शहरात भक्तीमय वातावरणात सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

0
9

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

हे सामूहिक पारायण श्री संत गजानन महाराज मंदिर, कोठारी नगर, धामणगाव रेल्वे येथे सकाळी ७.०० वाजता सुरू होणार असून २१ अध्यायांचे पारायण पूर्ण होईपर्यंत चालणार आहे. पारायण समाप्तीनंतर लगेच महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच, सिद्धिविनायक गणपती गजानन देवस्थान, कृष्णा नगर, धामणगाव येथेही जागतिक पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी सकाळी ८.३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.

या पवित्र प्रसंगी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad