धामणगाव रेल्वे (दि. 26 ऑक्टोबर)
सहस्त्रबाहू कलाल समाज संघटन बहुउद्देशीय संस्था, अंजनगाव सुर्जी (नोंदणी क्र. 431/015) यांच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी गुणगौरव व सत्कार समारंभ तसेच समाज महामेळावा भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य, कर्तृत्व आणि शैक्षणिक यश प्राप्त केलेल्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रासह इतर प्रांतांमधील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. भगवाणजी डोहळे यांनी भूषविले. संस्थेचे सचिव तिर्थराज बिजेवार यांनी प्रस्ताविक मांडून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. उद्घाटनप्रसंगी डॉ. राजेश चवरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले, तर रुपलालजी कावळे यांनी समाजातील एकोपा आणि संघटिततेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे संचालन सौ राधाली भूषण धुवे व कांचन पाले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपल्या भाषणात कावली येथे लवकरच समाजभवन उभारण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या हस्ते माधव शेंडे, मयूर धुवे, रश्मी कावळे, खुशबू पिपरीवार आणि स्नेहल महाजन यांना “कलाल समाजरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण शेंडे, वासुदेवराव डोहळे आणि डॉ. चवरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच 10वी व 12वी मध्ये उल्लेखनीय गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहस्त्रबाहू कलाल समाजाच्या सर्व वर्गीय अध्यक्ष सौ. रेखा गजानन पिंप्राळे यांनी दिलेले विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. त्यांच्या समाजसेवा, नेतृत्वगुण आणि सक्रिय सहभागाबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याच्या यशासाठी नंदलालजी कावरे, रामेश्वर कावरे, भूषण धुवे, अरुण महाजन, हेमराज बिजेवार, मनोज कावरे, राजू पिंपळे, राजकुमार जांभळे, प्रमोद शेंडे, रुपेश शेंडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विनोद धुवे यांनी केले.












